का रे दुरावा...
का रे दुरावा...


मन आता न सांगता कळतंय
प्रेमात तुझ्या विव्हळतोय
दुःख हसता हसता रडतंय
काळजीचा पान्हा फुटतोय...
शब्दात सुंदर काव्य रचतंय
आनंदात संगीत डोलतंय
प्रेमात सुख जणू शोधतंय
क्षणात मला पारखं होतंय...
आठवणींचा नुसता काहूर
स्पर्शाचा सुखद आभास
ओठांवर फक्त एकच नाव
सतत आसपास तुझा भास...
<
p>
बोलण्यात आहे तुझी वाणी
प्रेमाचा रंग हा असा मुरला
हास्यात माझ्या तुझी लया
माझा मुखडा डोहात रंगला
आठवण होता जवळ नाही
का फक्त कायम हुलकावणी
प्रेमाची माझ्या आता कितीदा
गाऊन झाली बघ रे लावणी...
प्रेमछंद आता असा जडला
सहन होत नाही स्वप्नी सांगावा
घालमेल जीवाच्या जखमांची
सांग ना... का रे इतका दुरावा...