*क.....*
*क.....*
1 min
14.2K
*क.....*
झग्याचा छान गळा
हिरवागार फुलला मळा
क...क...होतो
कमळा...कमळा...
*ख......*
गोड आहे गरा
हलवतो जरा
ख...ख...होतो
खरा...खरा...
*ग...*
उन्हाचा चढला पारा
आवर पसारा सारा
ग....ग...होतो
गारा....गारा
*घ.....*
चिकटवायला खळ
पाण्याचा नळ
घ....घ....होते
घळ,..घळ...
*च.....*
राम आहे आमचा
रवी आहे तुमचा
च...च....होतो
चमचा....चमचा