जय विज्ञान
जय विज्ञान
1 min
420
सी.व्ही.रमण,
यांचा जन्मदिन,
राष्ट्रीय विज्ञानदिन,
म्हणून करती जन ।।
समाजातील वैगुण्य,
कुप्रथा दूर सारुन,
अंधश्रद्धा निर्मुलन,
देश करु सज्ञान ।।
निसर्गाचे रक्षण,
आणि संवर्धन,
ठरेल नवसंजीवन,
वाचेल पर्यावरण ।।
ह्रास थांबवून,
आभार मानून,
करु ज्ञानदान,
वाढवून शान ।।
आजच्या गर्भात,
भाविष्य उदयाचे
करुनी सारे जतन,
बनू प्रगतीशील साधन ।।
शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण,
भारतीयांची आहेत शान,
आम्हा सदैव अभिमान,
वाटू जगभर त्यांचे ज्ञान ।।
