जुने कौटुंबिक फोटो
जुने कौटुंबिक फोटो
1 min
354
आमच्या कुटुंबाचे
एकत्र काढलेले फोटो
जुन्या अल्बममधे
अचानक सापडले
छोटेपणची वेंधळी मी
अल्लड नि गोड
भाऊ नि बहिणीसोबत
फोटोसाठी चढाओढ
आईबाबांच्या कडेवर
मी आणि छोटुकली
गाल फुगवून हसताना
फोटोची क्लिक दाबली
लहानपणचा ठेवाच जणू
जुन्या फोटोत सापडला
मनाला खरेच माझ्या
परमानंद मिळाला
