STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Others

3  

Dhananjay Deshmukh

Others

जरा बघ मागे वळून एकदा

जरा बघ मागे वळून एकदा

1 min
294

तू जरा बघ मागे वळून एकदा,

डोळे मिटलेले तू उघड एकदा.

सरकेल रात अंधारी धीर धर जरा,

चंद्र पौर्णिमेचा तो उगवेल पुन्हा एकदा.

नको जाऊ कधी खचून तू असा,

हो मार्गस्थ पुसून आसवे डोळ्यातली एकदा. हरलास जरी किती रणात जीवनाच्या, झटकून मरगळ कालची ती उठ तू पुन्हा एकदा.

आहे मुठीत तुझ्याच तो सूर्य,

रखरखत्या ज्वाळा त्याच्या झेल तू एकदा. नको होऊ लाचार तू चरणी संकटाच्या,

कर उठून मात त्यावर तू पुन्हा एकदा.

घेण्या आदर्श ताण सोडून जगणाऱ्यांचा फिरवून पाठ बघ जरा वळून मागे तू एकदा.


Rate this content
Log in