ज्ञानेद्रियाची ओळख
ज्ञानेद्रियाची ओळख
1 min
29.9K
या मुलांनो या रे या
अवयवाची काम जाणूया
सुवास नि कुबट
वास आहे अनेक.
वास घ्यायला
नाक आहे एक.
पाहुनी भवती
मिळे खुप ज्ञान.
टकमक बघती
डोळे दोन छान.
घरातला आवाज
असो दुरचा बाजा.
कानाने ऐकतो
आपण सारे राजा.
गोड आंबट कडू
चवी आहेत नाना.
चव घेते जीभ
जीभ म्हणजे रसना.
मऊ नि खडबड
गार आणि गरम.
त्वचा समजते स्पर्श
टोचणारा व नरम.
कान नाक डोळे जीभ
त्वचेमुळे होते ज्ञान.
म्हणून अवयवास त्या
ज्ञानेंद्रियाचा मान.
