STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

जनरल बॉडी मिटींग...!

जनरल बॉडी मिटींग...!

2 mins
27.4K



काय झालं ?

सारे मेम्बर का नाही आले?

अध्यक्ष महोदय..

काही परदेशी गेलेत

काही घरीच अडकलेत


काहींना येण्याचं तिकीट नाही मिळालं

काहींची गैरसोय झाले

काहिंना अजीर्ण झालंय

काही अत्यावस्त आहेत

काही रिटायर झालेत


काहींना मुलं सोडत नाहीत

काहिंना बायको सोडत नाही

काहिनीं राजीनामा दिलाय

तर काही सन्यस्त झालेत

अध्यक्ष ..त्यांना नोटीस दिले ना?


कोरम फुल्ल झाला नाही तर

याच जागेवर मिटींग होईल

आणि सर्व ठराव बिनविरोध

मंजूर केले जातील म्हणून ?

अध्यक्षमहोदय काळजी नको


विरोधकांना साऱ्या

परदेशी वारीला पाठवलंय आणि

सभागृहालाच बाहेरून कुलूप लावलंय..!

अध्यक्ष...मग ठीक आहे ,

आजचे सारे ठराव एक मताने मंजूर


मी सोडून सारे

पिंड गोळा करायला जातील

सारे पिंड इथे जमा करतील

मुक्ती कुणालाही द्यायची नाही..!

का अध्यक्ष महोदय....?


मी सांगतो म्हणून,

अरे रस्ते चांगले केले तर

रोजगार कसा टिकून राहील..?

दवाखाने कसे चालतील..?

वाहन कारखाने कसे चालतील..?


आपली सत्ता कशी टिकेल...!

पुढच्या वर्षी पक्ष पंधरवड्यात

आपल्याला कोण विचारील..?

म्हणून मी सांगतो तस करा

जरा वेळाने दर्भाचा स्पर्श


झाल्यावरच पिंड उचलून आणा

कोणाच्याही हाती लागू नका

नाही तर मागच्या वर्षीच्या गण्यासारखं

कोणी तरी पकडून मुक्ती देण्याचा

धंदा काढून बसेल आणि

डिजीटल इंडिया म्हणून

मुक्ती सर्वत्र व्हायरल करून

मुक्ती देत बसेल....!


चला आता कामाला लागा

आपल्याला काळजी पूर्वक

आता हा लढा डोळ्यात तेल घालून

जिंकायचा आहे हे विसरू नका...!!


सभा बरखास्त...!

सारे पांगले खरच दिसेनासे झाले

आता गुगल वर कावळे शोधतोय आणि

अध्यक्षांच्या चलाखीचे कौतुक करतोय...!


Rate this content
Log in