जन्मस्थान
जन्मस्थान
1 min
333
पुण्यनगरीत शनिवारपेठेत
झाला जन्म माझा
ठिकाण बघण्याची उत्सुकता
पोचली पार शिगेला.
फुटक्या बुरुजाजवळ
टोलेजंग इमारत उभी
त्यातील दवाखान्यातच
जन्म घेतला अस्मादिकांनी.
अजूनही इमारत तिथे
मजबूत शाबूत आहे
दवाखाना बघायला
आतुर मन माझे.
सर्व काही न्याहाळले
मनाची झाली इच्छापूर्ती
जन्मस्थळ बघितल्याची
मनात दाटली खुशी
