STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

जन्मकुंडली

जन्मकुंडली

1 min
240

चार भिंतीमागच आयुष्य तुझ 

आज जगताना कळतय मला 

घरातला तुझा सहवास सखे 

हवाहवासा वाटतोय मला ॥१॥


बाहेरच फसवं जग किती

सुंदर अन् मनमोहक दिसतं 

 तुझ्या मांडीवर निजण्यात 

जन्मोजन्मीच सुख असतं ॥२॥


तुला गृहीत धरून आजवर 

बिनधास्त जगत आलो

मनाला पटेल तसे मी 

नेहमीच वागत आलो ॥३॥


माझ्या आनंदात तुझं सुख 

कायमच तू स्विकारलंस

स्वप्नांना आकार देत माझ्या 

तुझं स्वावलंबन नाकारलस ॥४॥


अडचणींची जन्मकुंडलीच 

जणू तुझ्या पाठीशी आहे

अडसर बाजूला सारत

 तू मात्र खंबीर उभी आहे ॥५॥


Rate this content
Log in