जन्मकुंडली
जन्मकुंडली
1 min
11.8K
हा भवसागर मोठा,
याच्या उंच उंच लाटा,
माया दाटली चौहीकडे,
भगवंता तू कोठे रे?
काम व्यापला सर्वत्र,
इच्छा नाही पुर्ण झाली,
क्रोध घेई तेथे उडी,
लोभ वाढत चालला,
शांती कोठे घेऊ देवा?
मत्सर भरला रोमरोम,
दुःख देई लाभाविण,
दंभ सांगा कसा कसा?
शेत राखतो बुजगावणे जसा.
अंहकार काही सुटेना,
देव भक्ता भेटेना,
हानी विकाराने केली
नका पाहू जन्मकुंडली
