STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

5.0  

Asmita prashant Pushpanjali

Others

जिवन नाव याचेच परिवर्तन

जिवन नाव याचेच परिवर्तन

1 min
1.0K


बंद पापणी ही डोळ्याची।

स्वप्ने उद्याची आहे लपवूनी।

कृष्ण धवल ही स्वप्ने की।

रंगीत जीवन आहे दडवूनी।1


उष्षकाल होवूनी या भोर पहाटे।

काळरात्र ही संपली आहे।

आज पुन्हा नव आयुष्याने।

पेटवीली ही मशाल आहे।2


कुहू कुहू ची तान मंजूळ।

छेडीत कोकीळा पुरवेस गाय।

घमघमाट सुटला आंबाच्या मोहरी।

रूचकर आंबड गोड कैरी।3


पिवळे लाल तपकीरी वृक्षाने।

झटकूनी जुने रूप ते मरगळले।

ओढवूनी कोवळी कोवळी शेवाळी।

डौलात डोलतोय स्वतास सजवूनी।4


निसर्गाचे हे चक्र निरंतन।

संदेश मानवास देतो कायम।

रडू नकोस रूसू नकोस।

जीवन नाव याचेच परिवर्तन।5


Rate this content
Log in