STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

जीवन-प्रवास

जीवन-प्रवास

1 min
379

जीवनाचा प्रवास

विधाता सुरु करतो

प्राक्तनाप्रमाणे

तिकीट काढून देतो


रम्य बालपण येता

गाडी जोरात धावते

गाणी गप्पागोष्टी

ह्यात बालक रमते


पौगंडावस्थेत मन

मित्र मैत्रिणी वर्तुळात

चेष्टा खेचाखेची गंमत

वाट सरे झटक्यात


यौवनाचे रंग गुलाबी

साथ वाटे हवीहवीशी

मैत्रिणीची हो बायको

मजा येतसे भांडणातही


चाळिशीची चाहूल येता

पोक्तपणा ये मना

सोडून देई दुजेपणा

मन धावे जनकल्याणा


साठीमधले रंग

विरक्तीचे असती

इदं न मम म्हणती

दान करुन टाकती


पंच्याहत्तरी साजरी

हीरक महोत्सत्वाची

मन लागे पैलतीरी

चाहूल लागे मृत्यूची


कुणान माहित

हा जीवन-प्रवास

कधी संपतो

अखेरचा क्षण

मनुजाला

अज्ञातचि असतो


Rate this content
Log in