झरे पाऊस कोवळा
झरे पाऊस कोवळा
1 min
236
यमुनेच्या काठी कान्हा
गोपींसवे रासक्रीडा
वाजे मुरलीचा पावा
सारे गोकुळ हो गोळा
नभी मेघ दाटताती
घन ओथंबून येती
रिमझिम पावसाची
खेळ रंगात रंगती
ऊन हळदुले आले
रंग साजेसा पिवळा
इंद्रधनू नभी साजे
झरे पाऊस कोवळा
येई सर हलकीशी
खेळ ओल्या काठावरी
क्रीडेमधी दंग गोपी
कुणी नसे भानावरी
माय यशोदा कौतुके
पाही अगम्य सोहळा
तन मनास डोलवी
कन्हैय्याची रासक्रीडा
