झोका (बालकविता)
झोका (बालकविता)
1 min
406
लाकडाचा पाट त्या
पाटाला बांधली दोरी
पाटाचा झाला झोका
बसलेय त्यावर ही छोरी
झोक्यावर झोका हळू
आनंदही तो ओसंडला
सोनेरी किरणांनी मग
फेर जणू तो नवा घेतला
बोलक्या डोळ्यांनी या
पाहतेय सभोवताली
हट्ट माझा पुरवला तो
झोक्यावर स्वार झाली
लेक आहे तुमचीच हो
चूके काळजाचा ठोका
आई - बाबा बघा जातो
कसा ऊंच माझा झोका
