STORYMIRROR

kishor zote

Others

4.1  

kishor zote

Others

झाडे लावा झाडे जगवा

झाडे लावा झाडे जगवा

1 min
2.3K


झाडे लावा झाडे जगवा

वेळ आली मंत्र जपण्याची

चला मुलांनो घेवू या शपथ

ही वृक्षसंवर्धन करण्याची.....


कुंडी, मोकळी दिसता जागा

झाडे त्यातही मग लावण्याची

रिकाम्या त्या प्लास्टीक बाटल्या

मनिप्लांट त्यात दारी लावण्याची.....


रस्त्याच्या कडेला भरधाव जाता

वेळ बिया मातीत फेकण्याची

ng>

पाऊस पडता उगवेल रोप नवे

पाहुण त्याला स्मीत हसण्याची.....


उगाच नको वृक्षतोड करणे

प्रत्येकास तशी समज देण्याची

वाळवंट करू नका धरती

वेळ आली आता सावध होण्याची....


आज वृक्ष लागवड संवर्धन

ठेव तीच पुढच्या पिढीची

आठवतील घेतील नाव आपले

घटीका तीच स्मरण करण्याची.....


Rate this content
Log in