झाडाची व्यथा
झाडाची व्यथा

1 min

12K
झाड बोले मानवा,
'ऐक माझी कहाणी
हिरव्या वनराईने
जिंदगी तुझी सुहानी.'
'पक्षी थाटतात संसार
माझ्या अंगाखांद्यावर.
सावलीत विसावतो
वाटसरू थकल्यावर.'
'फळे फुले नि रबर
माझ्यामुळेच पाऊस.
संगोपन कर माझे
पूरव धरेची हौस.'
'लाकूड औषधे डिंक
देतो ना मी तुम्हाला.
स्वार्थापायी मानवा
छळू नको रे आम्हाला.'
'केलीस जर वृक्षतोड
होईल तुझाच घात.
तुझ्यासाठी तूच कर
प्रदूषणावर मात.'
'सुखी जीवनासाठी
कर तू वृक्षारोपण.
स्वच्छ आणि सुंदर
ठेव रे पर्यावरण.'