जगुन घे सखी....
जगुन घे सखी....
1 min
190
थोडं तु ही जगून घे .....
सखीवेळ सरते आहे.......!!
कर्तव्याला दे झळाळी
जप सगळ्यांचे मन,
कर सगळे गड सर,
पण तु ही थोडं जगुन घे......!!
जप स्वत:ला वाढवं बाळाला,
शरिराची घे काळजी,
सांभाळ तुझ्याही रुपाला
संस्कारक्षम घडव त्यासही,
पण तु ही थोडं जगुन घे......!!
वेळ सरेल पक्षी उडतील पिंजर्यातून,
गुंतलेले मन भरकटेल,
मग जाणिव होईल स्वत:ची,
तेव्हा तुझ्या पंखातील बळ सरेल,
म्हणुन तु ही थोडं जगुन घे.......!!
नाती सोडतील हात,
शरिर नाही देणार साथ,
मग फक्त पश्र्चाताप,
म्हणुन सोड तो संसाराचा पाश,
तु ही थोडं जगुन घे.....सखी वेळ सरते आहे.........!!
