STORYMIRROR

Nagesh Dhadve

Others

2.7  

Nagesh Dhadve

Others

जगावे का मरावे ?

जगावे का मरावे ?

1 min
3.5K


चालत होतो स्वप्नातून
     जगाच्या दौऱ्यावर.........
डोक्यात विचार आणि
     डोळ्यात काही आशा घेऊन,
स्वप्नापेक्षा माझ्या
   वेगळीच होती दुनिया...
जाती, धर्माच्या नावावर
कायदा हातात घेऊनियां!
उपाशी होती ती....
    गोरगरिबांची जनता,
राजकारणाच्या कामगिरीवर
   किती दिवस थांबता!       
पाहूनिया स्थिती
दडूनिया भीती
     जगासाठी काय करावे?
स्वार्थपणाच्या दुनियेमधी
       जगावे का मरावे?

उपासाच्या नावावर
पाणी पीत होती मंडळी,
उपोषणाच्या मेळाव्यात
शेतकऱ्यांच्या भानगडी!
दुष्काळाच्या भीतीने
कोरडी झाली ती काशी
   पोटासाठी काहींनाही तर
शेतकरी घेतायत फाशी!
अत्याचाराच्या दुनियेत
कशी ओंजळ भरावे
जगासाठी नव्हे तर,
स्वतःसाठी जगावे की मरावे?

परोपकारीच्या नावाने
कसे जगायचे आता?
कोणासाठी कोण नाही
कशी सांगायची गाथा?
अंधारातल्या स्वप्नातली 
झोपच आता उडाली,
घरे तुटता तुटता
आता विश्वास सुद्धा मोडले!
घाती दुनिया जगताना
आता स्वतःला सावरावे
मी नाही कोणी नाही
त्यापरीज स्वप्नातच मरावे!!!

-नागेश(ndd)


Rate this content
Log in