STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

जैसे ज्याचे कर्म तैसे

जैसे ज्याचे कर्म तैसे

1 min
538

जशी करणी , तशी भरणी

नियमच आहे , नियतीचा

चांगल्या कर्माने , फलप्राप्ती

वाईट कर्मासाठी , शिक्षेचा (१)


पेराल तसेच उगवते

वैश्विक सत्य , हेच सांगते

पवित्र बीज , लावणा-याचे

झाड कसे , बहरुन येते  (२)


कौरव पांडवांची करणी

अवतरली , कुरुक्षेत्रात

सत्यवादी , पांडव विजयी

आदर्श ठरलेले , जनांत   (३)


संस्कारांचे , शिक्षण पालक 

बालपणी , मनी रुजवती

संस्कारांच्या , आदर्शावरुनी

पथ जीवनाचा , आक्रमती  (४)


जशी जडणघडण घडे

तसे फळ पदरात पडे

कुसंगतीने , जीवनातील

सुखावरी , विरजण पडे  (५)


नियम हाच , सर्वांसाठी

आस मनी धरा , सत्कर्माची

पेराल तसेच उगवते

कास धरा , अखंड सत्याची (६)


Rate this content
Log in