STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Others

3  

Aniket Kirtiwar

Others

जाते तुजला सोडून..

जाते तुजला सोडून..

1 min
4.8K


जाते सोडून तुजला मी रे

दुरदेशी बाळा

आभाळ करेल माया तुजवर

अन् शिकवतील जग शाळा


दैवाला ह्या कोण रे चुकले

तु अन् मी तर तिची चिमुकले

ज्यांनी दिला जन्म तुजला तोचि लावेल लळा, जाते सोडून......


एक आस होती मनी रे

आई म्हणावे मला कुणी रे

बाळ गोजिरं किलबिलतील अन् बहरेल हा मळा, जाते सोडून......


नऊ महिने मी वाट बघितली

स्वप्न फुलांची माळ गुंफिली

कितीक सोसल्या प्रसवतेच्या जीवघेण्या कळा, जाते सोडून......


Rate this content
Log in