जात
जात
बऱ्याच दिवसांनी कोणीतरी भेटलेली
पाहताक्षणी ती आपलीशी वाटलेली
का कुणास ठाऊक पण
पण मनाला मात्र वेड लावून गेलेली
पहिल्यांदा तिला मैत्रीसाठी विचारलं
तिनंही ते निसंकोचपणे स्विकारल
हळूहळू मैत्रीचं नातं प्रेमात कधी बदललं
हे दोघांनाही नाही कळालं
कधी नव्हे ते पहिल्यांदा
प्रेम झालं होतं
अन तिच्याच आठवणीत
मन रमू लागलं होतं
हळूहळू प्रेमाच्या या नात्यात
गोड गोड बोलणं चालू झालं होत
आणि या सगळ्या पसाऱ्यात
मी स्वतः ला हरवत चाललो होतो
प्रेम वाढत गेलं
बोलणही वाढू लागलं
बोलता बोलता एकमेकांचे विचार
दोघांनाही पटू लागलं
पण सहजासहजी होते
ते कसले प्रेम
या प्रेमाच्या गोड नात्यालाही
पार करावा लागतो अडथळ्यांचा गेम.
पुढे जे व्हायचं होतं तेच झालं
या प्रेमळ नात्यात जातीचं वादळ आलं
अन् पहिलंवहिलं मनापासून केलेलं प्रेम
या जात नावाच्या वादळान भुईसपाट केलं
