STORYMIRROR

Shashikant Shandile

Others

2  

Shashikant Shandile

Others

जाशील तू कशी मज सोडूनी अशी

जाशील तू कशी मज सोडूनी अशी

1 min
2.7K


जाशील तू कशी मज सोडूनी अशी  

विना चंद्रिकेच्या हा जगणार का शशी

प्रेमाचे चार दिस देउनी दे मला

गमवून मग तुला रडणार हा शशी

जाशील तू अशी ..................

विसरून चंद्रिकेला भोगेल तो ख़ुशी  

प्रीत स्वार्थी नाही ती वागेल जी अशी

वाटेवरी जीवनाच्या देणार साथ मी

जाऊ नको ना तू खचूनिया अशी

जाशील तू अशी ..................

आले जरीही दुःख वाटेवरी तुझ्या

घेऊन हात हाती हसवेल तो शशी

नेऊ नको रे देवा दूर चंद्रिकेला तू

विना चंद्रिकेच्या हा जगणार का शशी

जाशील तू अशी ..................

जाशील दूर जेव्हा सोडुनी तू मला

घेईल श्वास पुरता जगण्याचा हा शशी

बघ एकदाची जाऊन तू दूर गं कधी  

दिसणार नाही तुला कधीच मग शशी

जाशील तू कशी मज सोडूनी अशी  

विना चंद्रिकेच्या हा जगणार का शशी

दिस चार प्रेमाचे देउनी दे मला

गमवून मग तुला रडणार हा शशी

 


Rate this content
Log in