STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
172

राजा जाणता राष्ट्राचा, जिजाऊंनी घडविला

ऋण हे मराठी मनी, इतिहास घडविला


गुरु दादाजींनी दिले, परिपूर्ण अध्यापन

तनमनी बाणविले, संस्कारांचे थोरपण


मावळ्यांची छोटी फौज, आले मुघल जेरीला

शक्तीहूनी युक्ती श्रेष्ठ, नाद डोंगरी घुमला


केली पारख नेटकी, आणि व्यूहाची रचना

युक्तीने सुटतो कैदी, लूटे सूरत खजिना


श्रेष्ठ गुरु रामदास, गुप्त खलिते धाडिले

भक्तीतुनी राष्ट्रप्रेम, मार्ग योग्यची दाविले


नेक शूरवीर योद्धे, प्राणपणाला लाविले

राजाने राज्य स्थापिले, मुघलांना हटविले


खाण सौंदर्याची अशी, सून सैन्याने आणिली

माता मानूनी तिजला, घरी आदरे धाडिली


परक्यांच्या अत्याचारे, रयतेत हाहाकार

देऊनिया पितृछत्र, प्रेम देई अनिवार


धडाडीने शिवबाने, छाव्यालाही घडविले

प्रेम अबोल पित्याचे, सदैव अबोल राहिले


असा ज्येष्ठ श्रेष्ठ राजा, सारा महाराष्ट्र मानी

भूषणचि महाराष्ट्रा, वंदनीय मनोमनी


Rate this content
Log in