STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
156

कडेकपारी डोंगरमाथी, हा बाळ शिवाजी खेळ।

कसे विसरावे शिवनेरी हे, शिवबाचे जन्मस्थळ।।धृ।।


जिजामातेनं दिली हो शिकवण, इतिहासाची छान।

राजनीती आणि पराक्रमाचा, शौर्य, धैर्य अभिमान।।

पर स्त्री माता समान जाना, परधन माना वमन।

कडेलोट करी शिवबा त्यांचे, जो ना मानी वचन।।

गोळा करुनी पोरं मावळी, इथं बाळ शिवाजी खेळ।

त्यातून जन्मले वीर शूर अन्, शिवबास मिळाले बळ।।१।।


आदिलशहाच्या दरबारामधी, विडा उचलीला खानानं।

प्रतापगडाच्या पायथ्याला त्यास, लोळविले शिवबानं।।

लाल महाली पुण्यात लपला, तो मामा शाहिस्तेखान।

या अल्ला करून पळाला तो, बोट तोडता शिवबानं।।

गमिनी कावा करू लढले, शिवबाचे मावळी बळ।

शिवरायाना दिले तयांनी, स्वराज्य उभारण्या बळ।।२।।


सलाम करते जनता त्यांना, कंठाशी आणून प्राण।

अजूनही आहे मनात आमच्या, शिवबाचा अभिमान।।

आडवे आले स्वकीय आपुले, मागत सवता सुभा।

संत सज्जना जमवून शिवबानं, महाराष्ट्र केला उभा।।

सोळाव्या वर्षी घेतला तोरणा, हे सांगा कशाचे बळ।

स्वराज्यासाठी शिवबा बनला, शत्रूंचा कर्दनकाळ।।३।।


Rate this content
Log in