जाणीव
जाणीव
1 min
214
सोसला भार नऊ मास
जन्मलास तो दिस त्यांनी
नेहमीच मानला खास...
ईश्वराच्या मर्जीवर आहे
गड्या तुझा हरेक श्वास
तुझा इथला सारा प्रवास...
कुणी पकडले बोट तुझे
कुणी दिला तुला आकार
मातीतुन झाले चित्र साकार..
सावली नात्यांची सोबत
पेलतोस कसलीही आफत
आणि तेही पुरते मोफत...
पंख फुटले भूलतोस घरटे
गुणी बाळ होतसे करंटे
खोटे मुखवटे विचार खुरटे...
जन्म लाभला जाण ठेव
क्षणाक्षणाला भान ठेव
लहान मोठ्यांचा मान ठेव...
इथेच जन्म अंतही इथेच
ही जाणीव सतत राहावी
भावनांची या कदर व्हावी...
