जागतिक कोरोना तुझा विनाश
जागतिक कोरोना तुझा विनाश
1 min
635
देशावर महामारीचे संकट माजले
कोरोनाचे विषाणू फैले
देश आपला धोक्यात न यावा
जनहिताचा मनी संकल्प घ्यावा
जागतिक महामारी बंदी सारी
कोरोनामुळे आज वाईट बेकारी
भय आतलं संपत नाही
खोट्या जाहिराती चालूच राही
आपणच आपला रक्षक होऊ
कोरोनामुक्त लढा देऊ
शासनाच्या नियमाप्रमाणे आपण सारे वागू
काही दिवस घरात राहून आनंदाने जगू
जागतिक कोरोना तुझा विनाश होईल
समर्थ भारत आरोग्यमय होईल
स्वच्छतेचा मंत्र जपुया, निरोगी आपण सारे होऊया
डॉक्टर, पोलिस, आर्मी, सरकार यांच्या कार्यास सलाम करूया...
