STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

जागतिक कन्या दिन...!

जागतिक कन्या दिन...!

1 min
3.7K


गार हवेला सामोरं जाण्यापेक्षा

कधी कधी घरी असलेलं बरं

पोटभर जेवण केल्यावर

थोडी वामकुक्षी घेतलेल बरं


म्हंटल आज तसच करावं

थोडं दुपारचं आडव पडावं

दिवा स्वप्न पाहता पाहता

सुख स्वप्नात थोडं रमावं


झालं पाहता पाहता

डोळा छान लागला

स्वप्नाचा चांगलाच

गोड सूर जमला


छोटी बालिका दारी आली

काका काका येऊ का म्हणाली

तेंव्हा मला स्वप्नात जाग आली

कन्या दिनाची जाण झाली


स्वागत केले तिचे जोशात

संगोपन केले चांगले स्वप्नात

जाग येता डोळे पाणावले

जागतिक कन्या दिनाच्या

शुभेच्छां देताना माझे

ऊर सुखाने भरुन आले...!


जागतिक कन्या दिनाच्या

सर्व कन्या रत्नांना

मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा...!



Rate this content
Log in