STORYMIRROR

Sonali Parit

Others

3  

Sonali Parit

Others

जाग येईल का मानवा..?

जाग येईल का मानवा..?

1 min
46

निसर्गाची शिकवण ध्यानी राहील का रे तुझ्या ?

आता तरी सुधारणा होईल ना रे मानवा,

कर्म तुझे तुलाच वाट दाखवत आहे

प्राणी, पक्षी सर्वांनाच नाही का 

तुझ्या विकासापायी पळवून लावले ?

तीही नसर्गाची लेकरेच होती ना रे

पहा त्याच निसर्गाने आता 

मानवाला घरात कोंडीले

आणि प्राणी, पक्षी स्वच्छंदी फिरती रे

आपलीच प्रगती...

आपल्याच तोंडावर कापड ठेवते

आता इतरांना नाही 

आपल्याच माणसांना दूर लोटावे लागते,

नव्हते ध्यानी मनी अशी वेळ येईल आपल्या वर

निसर्गाने दाखवून दिले

मालक नाहीत तुम्ही या धरतीवर

आभार मानू निसर्गाचे 

इतके घाव सोसून देखील 

जिने जपले आपल्या लेकरा रे

काहीही झालं तरी भरभरून

देती मानवा तुला रे..!


Rate this content
Log in