STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

इंद्रधनूचं भावविश्व...

इंद्रधनूचं भावविश्व...

1 min
23.9K


कधी कधी सहज गवसतं इंद्रधनू 

थोडावेळ मनाला सुखावून जातं 

आकाशाला पारदर्शक टोपी घालून 

हुरहूर जीवाला नि नाहीसं होतं 


कल्पनांचा रंगेबेरंगी वेडा महामेरू 

लगबगीने उभा राही भावनांचा 

नजरेतला नसतो तो काही धोका 

हा तर भावविश्व अतरंगी रंगांचा 


बहुरंगी सात रंगांचं ते स्वतःचं 

तानापिहिनिपाजा प्रकाशगाणं 

आकर्षक स्वर्गमय विश्व लपणारं 

ज्याचा राजा इंद्रधनुष्य बेभान 


पहिल्या पावसातलं इंद्रधनुष्य 

जीवनाचं परिपूर्ण असे कोलाज

span>

भास असा मोरपिसारा जणू 

कधी रंगीत रेलगाडीचा साज 


आकाशावर झोका शोभे खास 

मोहक रूप भावुक हसवणारं 

रंगांच्या खेळ माळा मन अंगणी  

चक्क स्वतःत सर्वांना हरवणारं 


लहानथोर अशा सगळ्यांनाच 

कुतूहलानं भारावून ते टाकणारं 

सौंदर्य नकळत असे लाजवणारं 

पाऊसवेड्यांना प्रेम विश्व देणारं 


आठवणींची रेखीव नक्षी राही 

उभी, डोळ्यासमोर अनोखा रुबाब 

प्रेमाचा गुलाबी रंग हृदयी सजवून 

सात रंगात होऊन जाई गायब 


Rate this content
Log in