इच्छा ठेव
इच्छा ठेव
1 min
258
इच्छा ठेव जगण्याची
निर्भिडपणे वागण्याची
भिती कशाला बाळगायची
हक्क आपला मागण्याची
इच्छा ठेव निघण्याची
नव्या वाटेवर दौडन्याची
कदाचित अडखळून पडण्याची
बिनबोभाट रडण्याची
इच्छा ठेव हसण्याची
कोणावरही रूसण्याची
पंख पसरून उडण्याची
फूलपाखरासवे बागडण्याची
