STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

5.0  

Asmita prashant Pushpanjali

Others

हवे आहे माझे आयुष्य।

हवे आहे माझे आयुष्य।

1 min
303


मी एक स्त्री आहे।

हा काय माझा दोश आहे?

समाज व्यवस्था मला इथली कडलीच नाही।

पण न्यायव्यवस्था तरी माझ्यासाठी सकारात्मक आहे?


कित्येक शतक, दशकापासून

समाजाने, न्यायाने व परिवाराने

माझी चौकट आखली आहे.

जी मी मोडली नाही

आणि मोडण्याचा प्रयत्न केला

तरी

मला ती चौकट मोडूच दिली नाही

केवळ

स्त्री या नावावर।

पण

आता मला ती चौकट मान्यही नाही।

जी स्त्रीच्या नावावर माझे

मनुष्यत्व नाकारते.

माझे जगणेच अमान्य करते

म्हणून आता मला हवे आहे

माझे आयुश्य

फक्त एक मनुष्य म्हणून

फक्त एक व्यक्ती म्हणून।


Rate this content
Log in