STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

हत्तीदादाची व्यथा...

हत्तीदादाची व्यथा...

1 min
12K

हत्तीदादाचे मोठे मोठे कान 

मुंगीताईची त्यात दंगा मस्ती 

चिडून खाई तावातावात दात 

सगळे सज्ज मिटवायला हस्ती... 


उंड काका करे मुद्दाम मस्करी 

इवल्याशा डोळ्यात उडवी माती

कोल्होबा जणू मालकच होई 

रुबाबात कर म्हणे द्राक्षाची शेती... 


उंदीर मामा फार बुवा खोडकर 

चोरून हत्तीदादाचा कान पिळी

दाखवली थोडी जरी दादागिरी 

बिचाऱ्या हत्तीचा जाई मग बळी... 


हत्तीदादाची जरी व्याकुळ व्यथा 

तरी प्रेम करी सगळे जीवापाड 

रक्षण करी मिळून त्याचे संकटात

होऊ देत नाही त्याला नजरेआड..


Rate this content
Log in