Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

हसरे तारे

हसरे तारे

1 min
14.2K


हसती, खेळती अन् बागडती

गोजिरवाणी ही फुलपाखरे

अल्लड, अवखळ आणि अचपळ

घरात असती हसरे तारे...१


कृष्ण सवंगडी जणू खेळती

बोल बोबडे बोलती सारे

गोकुळा सम भरून दिसते

घरात असता हसरे तारे...२


कितीही असला ताण मनावर

जातो शीण बिलगता सारे

स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो

घरात असता हसरे तारे...३


नटखट, खटपट, करती जेव्हा

घरात उठती हास्य फवारे

तऱ्हेतऱ्हेच्या खोड्या करती

घरात खट्याळ हसरे तारे...४


देवघरची फुले, मुले ही

ढंग तयांचे न्यारे न्यारे

भंडाऊन सोडी सकलांना

घरात असता हसरे तारे...५


शांत, निवांत, झोपती जेव्हा

घर खायाला उठते सारे

घरपण येते घरास, जेव्हा

घरात असती हसरे तारे...६



Rate this content
Log in