STORYMIRROR

yogesh Chalke

Others

3  

yogesh Chalke

Others

हसा मुलांनो हसा????

हसा मुलांनो हसा????

1 min
1.1K


डोळयामध्ये येती अश्रु ..रडूनी दुखतो घसा

अमाप दुःखे पाहुन म्हणता...हसा ,मुलांनो हसा...?


नाही पुस्तक. .बंद शाळा..

बालपणावर भलता घाला

तुटक्या पाट्या गिरवित म्हणता...हसा, मुलांनो हसा ...?


पोट रिकामे...उपडी भांडी

धरणांनाही पडल्या खांडी

अन्नापाण्या शिवाय म्हणता ....हसा, मुलांनो हसा ..?


मैदानावर पसरून काटे

नाव कुणाचे करता खोटे

खेळ खंडोबा करूनी म्हणता ... हसा, मुलांनो हसा. . ?


नाही वस्त्रे ..नाही सहारा..

खचले पालक..जिर्ण निवारा. .

पाऊस वा-या मधेही म्हणता.....हसा, मुलांनो हसा..?


Rate this content
Log in