हरवलेला माणूस
हरवलेला माणूस
1 min
333
हरवलेल्या माणुसकीचा झरा
संकटात नक्कीच पाझरतो
जखमी पंखांच्या सावलीखाली
माणूस एकमेकांना सावरतो.
असताना जवळ सर्व काही
माणुसकी नेमकी दूर राही
कणाकणाच्या शोधात असता
माणुसकी कण कण वाढत जाई.
खरं तर हरवतो तो माणूसच
माणुसकी कधीच हरवत नाही
हा माझा हा तुझा भेदभाव असा
माणुसकी कधीच ठरवत नाही.
