हरितालिका पूजन
हरितालिका पूजन
1 min
242
आज हरितालिका
गौरी मी पुजिल्या
पाने फुले दुर्वा
मी त्यांना वाहिल्या....
हरितालिका माझी
उठून छान दिसते
चंदेरी पाटावर
सुरेख हो शोभते.....
शिवलींग वाळूचे
स्थापन मी केले
फुले अन बेलपात्र
त्यावर मी सजवले...
सौभाग्य माझे होऊ दे
उदंड आयुष्याचे
अलंकाराने सुंदर
दिवस सजण्याचे.....
व्रत करिते तप करिते
करिते हो मी आराधना
वैभवला मी वर मानला
वैभवची मी सौभ्यांगना.....
