॥ हरीहर भेट ॥
॥ हरीहर भेट ॥
पणती पोर्णिमेचा मोठा सण
दिव्याची आरास बघून आनंदी होते मन
भेट होते हरीहराची
वर्षाव करतात देव फुलांच्या पाकळ्यांची
नदी सरोवरी लावता पणतीचा दिवा
धरतीवर स्वर्गसुखाचा अनुभव येतो नवा
चार महिन्याच्या निद्रेतुन विष्णु होतात जागे
मनी त्यांच्या सुंदर भाव, नेत्र उघडता दिसावे शिवशंकर उभे
घेता विष्णुची भेट गळा शंकराचाही वर्ण झाला निळा
हरीने सोपवलेले असते कामकाज निवासस्थानी
हरी निघता भेट घेउनी आज
लक्षदिप उजळुनी बघावा
हा रम्य सोहळा हरीच्या दर्शनासाठी
अधीर होतो शंकर भोळा ॥
