होळी
होळी
1 min
412
वसंताच्या आगमनाची,
लागता सृष्टीला चाहूल,
जुने सोडून नवे जोडून,
सौंदर्याची पाडी भूल ।। १।।
होलिका सांगे सर्वांना,
वाईटाचा त्याग करुन,
चांगल्याचा संग धरुन,
सृष्टीचे करा स्तवन ।। २।।
पुरणपोळीचा गोडवा,
एक होऊन वाढवावा,
एकतेत शक्ती मोठी
संदेश पुढे पाठवावा ।।३।।
होळीत सारे जाळून,
आनंदाचा रंग भरुन,
रंगण्या तुमचे जीवन,
वृक्ष सारे आले नटून ।।४।।
राखण्या समतोल निसर्गाचा,
आनंदा सवे समाजभानाचा,
धोका सृष्टी नष्ट होण्याचा,
बाळगू सदा ध्यास रक्षणाचा ।।
