होळी
होळी
1 min
924
आई गं आई
आली ना होळी,
कर ना आता
पुरणपोळी।।
पोळीसोबत
दूध नि तूप,
खाया मजला
आवडे खुप।।
बाबा हो बाबा
आना की रंग,
भिजवेन मी
मित्रांचे अंग।।
रंगांसोबत
पिचकारी हवी,
जूनी नको हं
पाहिजे नवी।।
