होळी रे होळी
होळी रे होळी
1 min
191
सजवूया दारी होळीचा थाट
सडा रांगोळी न् सजवा ताट
नारळ गोवऱ्या आणा चला
गोलाकार रिंगण रचा चला
हलगी डफली तयार ठेवा
प्रसादाचा पेढा नारळ खावा
करा मनोभावे होलीकेची पूजा
मनातले वैरभाव करा वजा
धरून फेर पेटवा होळी
ठोका आता एकच आरोळी
होळी रे होळी
पुरणाची पोळी
