STORYMIRROR

Sanjay Gurav

Others

3  

Sanjay Gurav

Others

हळवा श्रावण

हळवा श्रावण

1 min
44

आला हळवा श्रावण 

नूर पालटला पावसाने

उन्ह पावसाचा सारीपाट

रंगला किती दिवसाने.


अवनीचा हिरवा शालू

फुलं माळलेली केसात

हिरवाईची वेल काय बोलू

बहरली रानात गावकुसात.


सणांची रेलचेल होईल

आनंद पसरेल गगनात

भावभक्तीचा पूर आता

चैतन्य फुलवेल मनात.


घन निळा श्रावण मास

व्रतवैकल्ये गोडाचे घास

हिरव्या सोनेरी स्वप्नामध्ये

हळव्या मोरपीसांचा भास.



Rate this content
Log in