हिशोब माझा
हिशोब माझा
1 min
2.7K
देवाच्या लेखणीत माझा हिशोब किती आहे
पाताळाचा धनी की मोक्षाचा वाटेकरू आहे
अनुभव जैसा तैसा मनी भाव आहे
आम्हावरी कृपा तुझी दयाघनरुपी माव आहे
सतकर्माच्या ओळी उमटल्या निजभाळी
कुकर्माच्या संगती खेळे पापाची होळी
हरे राम हरे राम म्हणून पुण्य करतो
कारण नरकाची भीती आहे
देवाच्या लेखणीत माझा हिशोब किती आहे
