STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

हिरवळ

हिरवळ

1 min
291

जलधारा या

कोसळती धरा

वाहते निर्झर

वाहे गार वारा


मातीत रूजले

बिज हे नवेले

पालवी नाहते

थेंब बरसले


पक्ष्यांचे गुंजन

मधुर निनाद

पंख फडफडे

आनंदे जलद


हिरवळ दाटे

ती दाटीवाटीत

शोभतो निसर्ग

गडद रंगात



Rate this content
Log in