*हिरवळ/गारवा*
*हिरवळ/गारवा*


आला महिना जून चा,
चाहूल लागली पावसाची,
वाहू लागले मंद वारे,
हळुवार सरी पावसाची...१...
धरणी माता सुखावली,
कोसळून धारा पावसाच्या,
पिके ही डोकी वर काढू लागली,
जशी दोन काने उसाच्या...२...
डोलू लागली शेती सारी,
सगळीकडे हिरवळ चादरी,
हवेचा झोका आला, जणू
मखमल पांघरूण सारे...३...
डोंगराची नवलाई सारी,
पान गळुनी सुखली जरी,
नवी पालवी फुटे झाडाला,
डोलू लागले जंगल सारे...४...
हिरवळ हिरवळ दिसू लागले,
मन प्रसन्न झाले, मस्त रमूनी
खूब जहाले,खेळुनी बागडुनी
खूप नाचले, मस्त जमुनी...५...
गारवा
आले दिवस थंडीचे,
गार गार वारा झोम्बतो
अंगाला, कुडकुडत बसी
चुली जवळ कोंम्बतो...१...
दवबिंदू ची किमया भारी,
गवतावर जशी चमके मोती,
पडती किरणे सूर्याची जशी,
माणिक मोती माणिक मोती...२...
खुरटी झाडांनाही पालवी फुटे,
शेती वाडीच्या मालालाही फुले,
फळे, फुटे,शेतकरी राजा मानी
आभार,गारवाच्या सुफलाला...३...
थंडीचा महिना पेटवूनी शेकोटी,
हातात नाही रक्ताचा कण,
शेकून होई हात नरम,हात नरम,
आला थंडीचा महिना जणू...४...
गारव्याची नवलाई भारी,
कुडकुडत करून, अंगाची
होई लाही लाही, हाथ बंधूनी
करी "हूर हूर" शहारून अंगच...५...