हिरवीगार धरती काया...
हिरवीगार धरती काया...
हिरव्यागार शालूच्या निसर्गाने
रानवाटा किमयागार नटलेल्या
चोहीकडे लहान-लहान बहरल्या
भातशेतीच्या रांगा सजलेल्या...
बळीराजाचा प्रिय बैल नि नांगर
चिखलातून पायवाट काढणारा
जमिनीवरची काया माती सजवून
कष्टाने माळरान फुलवणारा...
संथ खळखळत्या पाण्याच्या
धबधब्याचा येई मधुर नाद
डोळे दिपवणारे रमणीय दृश्य
नवलाईला घाली मंद साद...
सर करण्यास उंचच उंच डोंगर
लाकडी ओंडक्यांचा झुलता पूल
निसटती छोटीसी नागमोळी वाट
मनाला हळुवार निसर्गरम्य भूल...
धरती सजली रूपात विविधांगी
अशी मोहक भावनांत फुलली
धुक्याची मऊ चादर ती ओढून
नेत्र सुख देण्यास आहे बहरली...