STORYMIRROR

Kishor Zote

Others

2  

Kishor Zote

Others

ही दोस्ती ( सहाक्षरी )

ही दोस्ती ( सहाक्षरी )

1 min
490

ठरवले कोणी

पाडायची फुट

मैत्रीचे हे धागे

विनायचे दाट ॥१॥


कठिण समयी

मदतीचा हात

पाठीत खंजीर

होणार ना घात ॥ २ ॥


आवाज देताच

उभी राही फौज

हिच तर खरी

दोस्तीची रे मौज ॥ ३ ॥


खांदयावर ओझे

व्हावे ते हलके

दोस्त ते दिसता

होतसे बोलके ॥ ४ ॥


जीवनात स्थान

दोस्तीचे अढळ

दोस्ती ही हृदयाच्या

असते जवळ ॥ ५ ॥


Rate this content
Log in