हेच ते प्रेम...
हेच ते प्रेम...


ती एक प्रेम करणारी व्यक्ती निघून जाण्याची खंत मनात घर करणारी असते,
कारण ती मिठी, ते प्रेम, ते शब्द, ती ओढ, तो स्पर्श, ती वेळ मात्र संपून जाते
'१०० टक्के आपली' अशी खात्री असलेली आपली व्यक्ती आपल्यापासून दुरावते,
सुंदर वाटणारे आयुष्य इतके वाईट, निष्ठूर, कष्ट देणारे का होते?
व्यक्तीच्या सहवासात वावरण्याची हाव जाता जात नाही,
पण ती अगदी एका वाऱ्याच्या झोतासारखी आपल्यापासून लांब जाते
आपण नाते हळुवारपणे छान गुंफवत गुंफवत जातो,
पण मनाच्या कोपऱ्यात 'जन्माची साथ मिळेल की नाही?' याने मन खाते
त्या सुंदर, सुशील आठवणींमध्ये दिवस घालवावे लागतात,
अश्रूंनी सयी अलगदपणे जपायच्या असतात
त्या व्यक्तीच्यासुद्धा भावना दाटून येणार या गहिऱ्या प्रीतीने,
जिवापाड प्रेम करणारी व्यक्ती धावून येईल वाऱ्याच्या गतीने
तो सुगंध प्रेमाचा दरवळत असेल गुलाबाच्या पाकळीप्रमाणे,
कारण ते नाते असेल घट्ट अगदी समुद्रातील शंख-शिंपले यांच्यासारखे...