STORYMIRROR

Manisha Kasar

Others

2.5  

Manisha Kasar

Others

जीवन

जीवन

1 min
14.2K


संकटांना कधी कंटाळायचे नसते

त्याला सामोरे जायचे असते,

कुणी नावं ठेवली तरी थांबायचे नसते

आपलं काम चांगलच करायचे असते.


अपमानाने कधी खचायचे नसते

जिद्दीने बळ वाढवायचे असते,

निराश मुळीच व्हायचे नसते

चैतन्य सदा फुलवायचे असते.


पाय ओढले म्हणून परतायचे नसते

पुढे पुढेच धावत जायचे असते,

लोकनिंदेला कधी घाबरायचे नसते

आपलं धैर्य दाखवायचे असते.


जीवनात करण्याजोगे खूप असते

पण आपलं लक्षच तिकडे नसते

म्हणूनच,

प्रेमाने मन जिकायचे असते

प्रेमात लहान थोर मानायचे नसते.


Rate this content
Log in