STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

हे स्वातंत्र्य?

हे स्वातंत्र्य?

1 min
195

ये आझादी झुठी I देश की जनता I

भुखी ती झोपता | हे स्वातंत्र्य ? ॥१॥


दगड हातात | भीमा कोरेगाव |

होतसे वर्षाव । हे स्वातंत्र्य ? ॥२॥


दिवसा ढवळ्या | मुडदे पाडती |

मोकाट फिरती I हे स्वातंत्र्य ? ॥३॥


जाळपोळ सदा I आपलीच करी I

जखम ती उरी I हे स्वातंत्र्य ? ॥ ४॥


भीकारी जगती I उघडयावर ती ।

तसेच मरती I हे स्वातंत्र्य ? ॥५॥


भेदभाव सदा | सर्वत्र होतसे I

गळी लागे मासे | हे स्वातंत्र्य ? ॥ ६॥


शेतकरी असा | कर्जात बुडला I

फासी लटकला | हे स्वातंत्र्य ? ॥७॥


महामानवांचा I पडला विसर |

नवस ते कर | हे स्वातंत्र्य ? ॥ ८॥


बुवाबाजीचा हा | धरता तो नाद I

घडतसे वाद | हे स्वातंत्र्य ? ॥९॥


खरा इतिहास I लपवला जातो |

गुलाम बनतो I हे स्वातंत्र्य ? ॥१०॥


Rate this content
Log in