हे शब्द
हे शब्द
1 min
222
न बोलताच हे शब्द,
खूप काही बोलून जातात.
वेड्या मनाचे भाव असे,
अलवार त्यांना उमजून जातात
अबोल अधीरांची ती भाषा,
त्यांना अशी समजून येते.
चेहर्यावर उमटलेल्या भावनांची,
कोर्या कागदांवर कविता उमटते.
स्पर्शाविना सारे काही असे,
शब्दांना अलगद कळून येते.
खरंच कवीच्या मनाचा आलेख,
फक्त कविताच घेऊ शकते...
